बॉलिवुडचा किंग खान शाहरुख २०२.८ कोटी रुपयांच्या कमाईमुळे या वेळच्या फोर्ब्सच्या यादीत अव्वल ठरला आह़े  फोर्ब्सने जाहीर केलेल्या १०० भारतीय वलयांकित व्यक्तींच्या यादीत शाहरुख पाठपाठ सलमानने खानने दुसरा आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याने तिसरा क्रमांक पटकाविला आह़े
फोर्ब्सच्या अंदाजानुसार ऑक्टोबर २०११ ते सप्टेंबर २०१२ या कालावधीत शाहरुख खानने २०२.८ कोटी रुपयांची कमाई केली़  तर सलमान खानने १४४.२ कोटी रुपये आणि महेंद्र सिंग धोनी याने १३५.१६ कोटी रुपयांची कमाई केली आह़े  सलमान खान आणि महेंद्रसिंग धोनी हे दोघेही प्रसिद्धी, नावलौकिक या बाबतीत किंग खानच्या पुढे आहेत़  परंतु, सर्वाधिक माया जमविण्याची किमया मात्र किंग खानलाच जमली आहे, असा शेरा फोर्ब्स नियतकालिकाने मारला आह़े
फोर्ब्सच्या सुरुवातीच्या १० मान्यवरांमध्ये अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, करिना कपूर, विरेंद्र सेहवाग, विराट कोहोली आणि कतरिना कैफ यांचा समावेश आह़े  फोर्ब्सच्या यादीतील वलयांकित व्यक्ती साधारणत: ३० ते ५० या वयोगटातील आहेत़  तसेच १२ जण अगदी तरूण आहेत़  बॅडमिंटन पटू सायना नेहवाल(२३) ही या यादीतील सर्वात तरूण व्यक्तिमत्व आह़े