News Flash

शाहीन बाग प्रकरणी आजही निर्णय नाही; २६ फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी

कोर्टाने नियुक्त केलेल्या वार्ताकरांनी आपला सीलबंद अहवाल कोर्टात सादर केला. याचा अभ्यास करुन कोर्ट पुढील निर्णय देणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

शाहीन बाग आंदोलनावर सुप्रीम कोर्टात सोमवारी देखील निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, कोर्टाने नियुक्त केलेल्या तीन वार्ताकरांनी आपला सीलबंद अहवाल कोर्टात सादर केला. त्यानंतर कोर्टाने या अहवालाचा अभ्यास करुन निर्णय देण्यात येईल असे स्पष्ट केले. त्यामुळे कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी बुधवारपर्यंत स्थगित केली, त्यामुळे २६ फेब्रुवारी रोजी याची पुढील सुनावणी होणार आहे.

वार्ताकार असणाऱ्या वकील साधना रामचंद्रन आणि वरिष्ठ वकील संजय हेगडे यांनी अहवाल बंद लिफाफ्यात न्या. एस. के. पॉल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाकडे पाठवला. खंडपीठाने सांगितले, वार्ताकारांनी दिलेला अहवाल केंद्र आणि दिल्ली पोलिसांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वकील आणि याचिकाकर्त्यांकडे सोपवण्यात येणार नाही. वार्ताकारांच्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर पुढील सुनावणी २६ फेब्रुवारी रोजी होईल.

दोन मेट्रो स्टेशन बंद
सीएए विरोधातील आंदोलनानंतर रविवारी परिस्थिती अधिकच चिघळली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून सोमवारी सकाळी मौजपूर आणि बाबरपूर येथील मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात ठेवण्यात आले. त्यामुळे सोमवारी या स्टेशन्सवर एकही मेट्रो थांबली नाही. दरम्यान, शाहीन बागशिवाय जाफराबाद आमि सीलमपूरमध्ये देखील महिला आंदोलन करीत आहेत. शनिवारी रात्री जाफराबाद मेट्रो स्टेशनखाली महिलांनी रास्ता रोको केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 2:06 pm

Web Title: shaheen bagh case is not decided today the next hearing is on february 26 aau 85
Next Stories
1 Video: जुगाड फसलं! पृथ्वी सपाट आहे सिद्ध करण्याच्या नादात घरगुती रॉकेटनं केलं उड्डाण अन्…
2 साबरमती आश्रमातील त्या अभिप्राय नोंदवहीत ट्रम्प यांनी लिहिले…
3 पाकिस्तानने दहशतवादाचे अड्डे नष्ट करावेत – डोनाल्ड ट्रम्प
Just Now!
X