News Flash

अमित शाह यांच्या घरावर काढलेला शाहीन बाग आंदोलकांचा मोर्चा पोलिसांनी रोखला

प्रचंड फौजफाटा तैनात

गेल्या दोन महिन्यांपासून शाहीन बागेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरावर मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा रोखला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडून चर्चेचं निमंत्रण आलं आहे का? चर्चेला जाणाऱ्या शिष्टमंडळात कोण आहेत? आदी प्रश्न उपस्थित करत पोलिसांनी हा मोर्चा रोखला आहे.

सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शाहीन बाग चर्चेत राहिले. दरम्यान, अलिकडेच ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शाहीन बागेतील आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं होतं. “मी त्यांना (शाहीन बाग आंदोलक) सांगू इच्छितो की, त्यांनी माझ्या कार्यालयात येऊन वेळ घ्यावी. तीन दिवसाच्या आत मी त्यांना वेळ देईल. कुणालाही भेटण्यासाठी तयार असल्याचं मी सांगितलं. मात्र, कुणालाही चर्चा करायची नाही,” असं अमित शाह म्हणाले होते.

त्यानंतर शाहीन बागेतील आंदोलकांनी अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यासाठी रविवारी अचानक मोर्चा काढला. शाहीन बाग ते अमित शाह यांचं शासकीय निवासस्थान असा हा मोर्चा काढण्यात येणार होता. मोर्चा सुरूवात झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना रोखले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी वेळ दिला आहे का? त्याविषयीची माहिती द्यावी अशी विचारणा दिल्ली पोलिसांनी आंदोलकांकडे केली होती.

हा मोर्चा रोखल्यानंतर काही आंदोलक दिल्ली पोलिसांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. मोर्चा पुढे जाण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांकडून पोलिसांना केली जाणार आहे. दरम्यान, मोर्चा (अमित शाह यांच्या घरावर) काढण्यासंदर्भात त्यांनी (शाहीन बाग आंदोलक) आम्हाला माहिती दिली होती. पण, केंद्रीय गृहमंत्र्यांनी बोलावलेलं नसेल, तर मोर्चा काढू शकत नाही, असं आम्ही त्यांना सांगितलं. आम्ही आंदोलकांशी बोलू आशा आहे की, ते समजून घेतील,” अशी माहिती दक्षिण दिल्ली पोलीस उपायुक्त आर.पी. मीना यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 3:19 pm

Web Title: shaheen bagh protesters begin march towards home minister amit shahs residence bmh 90
Next Stories
1 पंतप्रधान मोदींनी केली राम मंदिराबाबत आणखी एक मोठी घोषणा
2 केजरीवालांच्या शपथविधीला पंतप्रधान मोदी का होते गैरहजर?
3 पोलीस आले अन्… त्यादिवशी जामियात काय घडलं? Shocking Video आला समोर
Just Now!
X