15 January 2021

News Flash

दिल्ली हिंसाचार प्रकरणी शाहरुखला अटक

दिल्लीतील हिंसाचारात ४० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे.

दिल्लीत ‘सीएए’ वरून उफळलेल्या हिंसाचारादरम्यान पोलीस कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखणारा तो लाल टी शर्टमधील तरूण अखेर पोलिसांनी पकडला आहे. शाहरुख असं त्याचं नाव असून त्याला उत्तर प्रदेशमधील शामली येथून ताब्यात घेण्यात आले आहे. हिंसाचाराच्या घटनेनंतर तो फरार झाला होता. मध्यंतरी त्या तरुणास ताब्यात घेतल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या, मात्र नंतर दिल्ली पोलिसांकडून तो अद्याप फरार असल्याचे सांगण्यात आले होते.

दिल्ली पोलीस सध्या त्याची कसून चौकशी करत आहेत. शिवाय, त्याला आश्रय देणाऱ्यांचा देखील तपास सुरू आहे. दिल्लीतील हिंसाचारादरम्यान २४ फेब्रवारी रोजी एका तरूणाने पोलीस कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखल्याचा फोटो माध्यमांवर आला होता. शिवाय, त्याने हिंसचार घडत असलेल्या ठिकाणी आठ गोळ्या देखील झाडल्या होत्या. मात्र नंतर तो गर्दीचा फायदा घेत फरार झाला होता.

अनेक दिवसांपासून दिल्ली गुन्हे शाखेचे पोलीस शाहरुखचा कसून शोध घेत होते. अखेर तो उत्तर प्रदेशमधील शामली येथे दडून बसल्याची माहिती मिळाताच, दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने त्याच्या मुसक्या आवळल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 1:37 pm

Web Title: shahrukh the man who had opened fire at police during violence in north east delhi has been arrested msr 87
Next Stories
1 दिल्ली हिंसाचार: “देशात शांतता आणि एकता गरजेची”; भाजपाच्या बैठकीत पंतप्रधान भावूक
2 सोशल मीडिया सोडण्याबद्दल संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींना सल्ला, म्हणाले…
3 Video: संसद परिसरात धडकली कार; सुरक्षा रक्षकांनी लगेच रोखल्या बंदुका
Just Now!
X