07 August 2020

News Flash

शायना एनसी यांची प्रसारभारतीच्या मंडळावर निवड

ट्विट करून मानले आभार

शायना एनसी. (संग्रहित छायाचित्र)

भाजपाच्या नेत्या व प्रवक्त्या शायना एनसी यांची केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयातंर्गत येणाऱ्या प्रसार भारती मंडळाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल शायना एनसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानले आहेत.

भाजपानं काही दिवसांपूर्वी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली होती. यातून उपाध्यक्ष असलेल्या किरीट सौमेय्या यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीच्या खनिजदार असलेल्या शायना एनसी यांना वगळण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर शायना एनसी यांना प्रसार भारती मंडळाच्या सदस्यपदी नेमण्यात आलं आहे.

शायना एनसी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय माहिती व प्रसार मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 11:57 am

Web Title: shaina nc nominated on prasar bharati board as a member bmh 90
Next Stories
1 हाँगकाँगमधून टिकटॉक घेणार काढता पाय, लवकरच करणार अलविदा
2 पाकिस्तानचे आरोग्यमंत्री करोनाबाधित
3 नैराश्यामुळे टिकटॉक स्टारची आत्महत्या
Just Now!
X