News Flash

विश्वचषकातील पराभवाच्या रागातून भारतीय क्रिकेट चाहत्यावर बांगलादेशमध्ये हल्ला

भारतीय क्रिकेट संघ आणि सचिन तेंडुलकर यांचा कट्टर चाहता म्हणून जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या सुधीर गौतम यांच्यावर रविवारी बांगलादेशच्या समर्थकांकडून हल्ला करण्यात आला.

| June 22, 2015 02:50 am

भारतीय क्रिकेट संघ आणि सचिन तेंडुलकर यांचा कट्टर चाहता म्हणून जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या सुधीर गौतम यांच्यावर रविवारी बांगलादेशच्या समर्थकांकडून हल्ला करण्यात आला. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना जिंकून बांगलादेशने मालिका खिशात टाकल्यानंतर हा प्रकार घडला. सुधीर गौतम रविवारचा सामना संपल्यानंतर मैदानाच्या बाहेर रिक्षा पकडत असताना त्यांच्यावर काही अतिउत्साही बांगलादेशी क्रिकेट समर्थकांनी हल्ला चढवला. यासंदर्भात बोलताना सुधीर गौतम यांनी आपण यापूर्वीही कधीही अशाप्रकारच्या परिस्थितीचा सामना केला नसल्याचे सांगितले. सामना संपल्यानंतर जेव्हा मी रिक्षा पकडत होतो तेव्हा अचानक काहीजणांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. यावेळी ते विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरीत भारताने बांगलादेशच्या केलेल्या पराभवाचा बदला घेत असल्याचे म्हणत होते. मात्र, त्याठिकाणी वेळीच दोन पोलीस आल्याने सुधीर गौतम यांची सुटका झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2015 2:50 am

Web Title: shameful bangladesh supporters attack famous indian fan sudhir gautam
टॅग : Cricket World Cup
Next Stories
1 स्वराज, राजे यांच्याविरोधात ‘आप’ची निदर्शने
2 दारूकांडाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल ‘आप’ची माध्यमांवर टीका
3 सहा महिने माध्यमांशी बोलणार नाही -पर्रिकर
Just Now!
X