03 August 2020

News Flash

…हा व्हिडिओ पाहा आणि पोट धरुन हसा

एक अफलातून हास्यकल्लोळ करणारा प्रँक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवर विविध प्रँक शो सर्रास पाहिले जातात आणि त्यास प्रेक्षकांची चांगली पसंती देखील मिळते

प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी काहीतरी हटके क्लुप्ती लढवून ‘प्रँक’ घडवून आणण्याचे सध्या आंतरराष्ट्रीय टेलिव्हिजनवर चांगलेच फॅड निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवर विविध ‘प्रँक शो’ सर्रास पाहिले जातात आणि त्यास प्रेक्षकांची चांगली पसंती देखील मिळते. यातील काही ‘प्रँक्स’ हे पोट धरुन हसायला भाग पाडतात. असाच एक अफलातून हास्यकल्लोळ करणारा ‘प्रँक’ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
समुद्रकिनारी पर्यटकांच्या आंघोळीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘ओपन शॉवर’मध्ये पर्यटक आंघोळीसाठी आले की, एक पठ्ठ्या त्यांच्या डोक्यावर नकळत शॅम्पू टाकत राहतो. मग काय, बराच वेळ शॉवरखाली राहून देखील शॅम्पूचा फेस कसा जात नाही? या प्रश्नाने बेजार झालेल्या व्यक्तीची धडपड पोट धरुन हसायला भाग पाडते. या प्रँकने सध्या सोशल मीडियावर धम्माल उडवून दिली आहे. नेटिझन्स या व्हिडिओवर लाईक्स आणि शेअरचा ‘शॉवर’ पाडत आहेत. तुम्हीही पाहा आणि पोट धरून हसा..

व्हिडिओ-

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2016 9:11 am

Web Title: shampoo prank video
Next Stories
1 बिगरराजकीय समिती नेमा!
2 विरोधातील आवाज दडपण्याचा प्रयत्न
3 आश्वासनानंतरही आंदोलन सुरूच!
Just Now!
X