News Flash

गर्भवती महिलांसाठी साबण, शाम्पू धोकादायक

आधुनिक जगात सौंदर्यप्रसाधनांना खूपच महत्त्व आले आहे.

घातक रसायनांमुळे गर्भपात होण्याची भीती
आधुनिक जगात सौंदर्यप्रसाधनांना खूपच महत्त्व आले आहे. मात्र पूर्वी नैसर्गिक साधनांद्वारे बनविल्या जाणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर होत असे. मात्र आता सौंदर्यप्रसाधनांमध्ये हमखास रसायनांचा वापर केला जातो. रासायनिक प्रक्रियाद्वारे तयार करण्यात येणारे साबण, शाम्पू आणि पाकीटबंद पदार्थ गर्भवती महिलांसाठी खूपच धोकादायक आहेत. या रसायनयुक्त सौंदर्यप्रसाधनांमुळे गर्भपात होण्याची शक्यता असते, असे चीनमधील शास्त्रज्ञांचे मत आहे.
पॅकिंग विद्यापीठातील या शास्त्रज्ञांनी नैसर्गिक गर्भपात झालेल्या ३०० महिलांचा अभ्यास केला. या बहुतेक महिलांचा गर्भधारणा झाल्यानंतर पाच ते १३ आठवडय़ांत गर्भपात झाला होता. या महिलांनी वापरलेल्या सौंदर्यप्रसाधने, पाकीटबंद पदार्थ आणि दैनंदिन वापरातील अन्य साधनांचा अभ्यास करण्यात आला. त्या वापरत असलेल्या साबण, शाम्पू आणि पाकीटबंद पदार्थामध्ये ‘थॅलेट्स’ नावाच्या रसायनाचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले. हे रसायन शरीरासाठी धोकादायक असतानाही त्याचा वापर अनेक कंपन्यांकडून केला जात आहे. या रसायनामुळेच या महिलांचा गर्भपात झाल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले.
थॅलेट्सचा अतिरेक वापर करणाऱ्या सहा उत्पादनांवर अमेरिकेत बंदी आहे. लहान मुलांसाठी असलेले पदार्थ व सौंदर्यप्रसाधनांमध्ये याचा वापर केला जात असे. मात्र रंग, मेडिकल टय़ूब, साफसफाई करण्यासाठी वापरण्यात रसायने, साबण, शाम्पू यांमध्ये थॅलेट्सचा वापर केला जात आहे.
या शास्त्रज्ञांनी काही प्राण्यांवरही प्रयोग करून त्यांचा अभ्यास केला. गर्भधारणा झालेल्या काही प्राण्यांचाही थॅलेट्सच्या वापराने गर्भपात झाल्याचे दिसून आले. महिलांनी रासायनिक सौंदर्यप्रसाधनांचा वापर करू नये. कारण थॅलेट्सचा अधिक वापर झाल्याने गर्भपात होण्याची भीती अधिक आहे, असे जिआन्यिंग हू आणि हुआर शें या शास्त्रज्ञांनी सांगितले. थॅलेट्सचा अतिरेकी वापर करणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 3:38 am

Web Title: shampoo soap dangerous for pregnant women
Next Stories
1 अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांसाठी ‘स्मार्टेरिअन’ कायदा
2 हार्दिक पटेलची आजपासून पटेल समाजातील आमदारांशी चर्चा
3 टीकाकारांच्या दबावामुळे बशीर यांचे ‘रामायणा’वरील स्तंभलेखन बंद
Just Now!
X