शनिशिंगणापूर येथील वादात आता आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्रीश्री रविशंकर यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी ७ फेब्रुवारीला येथे येण्याचे त्यांनी मान्य केले असून दोन्ही गटांशी चर्चा करून हा वाद सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.
माजी आमदार शंकरराव गडाख यांनी ही माहिती दिली. त्यांनी शनिवारीच बंगळुरू येथे श्रीश्री रविशंकर यांची भेट घेऊन येथील वाद सामोपचाराने मिटावा यासाठी पुढाकार घेण्याची गळ त्यांना घातली. रविशंकर यांनी ही गोष्ट मान्य केल्याचे गडाख यांनी सांगितले.
गडाख यांनी सांगितले की, शनिशिंगणापूर येथील परंपरा, देवस्थानची माहिती व सध्याची परिस्थिती रविशंकर यांच्या निदर्शनास आणून दिली रविशंकर यांनी सर्व स्थिती समजावून घेतल्यानंतर हा वाद सामोपचाराने मिटावा यासाठी मध्यस्थी करू, त्यासाठी ७ फेब्रुवारीला येथे येऊन संबंधित सर्वाशी याबाबत चर्चा करू, असेही त्यांनी मान्य केले, अशी माहिती गडाख यांनी दिली.