News Flash

मुंबईतील तीन वैज्ञानिकांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार

यंदा दहा वैज्ञानिकांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाले आहेत. मुंबईच्या टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रीसर्चचे रूप मलिक व प्रताप रायचौधुरी यांना अनुक्रमे जीवशास्त्र व

| September 27, 2014 06:06 am

यंदा दहा वैज्ञानिकांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाले आहेत.  मुंबईच्या टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रीसर्चचे रूप मलिक व प्रताप रायचौधुरी यांना अनुक्रमे जीवशास्त्र व भौतिकशास्त्रात हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 विज्ञान व तंत्रज्ञानातील विशेष कामगिरीसाठी हे पुरस्कार देण्यात येतात. सीएसआयआरचे महासंचालक पी. एस. आहुजा यांनी जीवशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरण विज्ञान, अभियांत्रिकी, गणित, वैद्यक, भौतिकशास्त्र या विषयांसाठी हे पुरस्कार जाहीर केले.
बंगळुरू येथील रामन रीसर्च इन्स्टिटय़ूटचे सादिक अली रंगवाला यांना भौतिकशास्त्रासाठी, तर नवी दिल्लीच्या इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायॉलॉजी या संस्थेचे अनुराग अग्रवाल यांना वैद्यक विज्ञानात हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हैदराबादच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचे एस. व्यंकट मोहन, मुंबईच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सौमेन चक्रवर्ती यांना अभियांत्रिकी विज्ञानात हा पुरस्कार जाहीर झाला आहे. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेचे कौशल वर्मा यांना गणितात हा पुरस्कार जाहीर झाला. रसायनशास्त्रात इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या बंगळुरू येथील संस्थेच्या कविरायानी रामकृष्ण यांना, तर इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायॉलॉजी या संस्थेचे सौविक मैती यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
कानपूर आयआयटीचे सचिद्दानंद त्रिपाठी यांना पृथ्वी, वातावरण, महासागर व ग्रहविज्ञान क्षेत्रात पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येकी पाच लाख रुपयांचा हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 6:06 am

Web Title: shanti swarup bhatnagar award to 10 scientist
Next Stories
1 मोदींवर कितपत विश्वास ठेवायचा?
2 मोदींना न्यूयॉर्कच्या न्यायालयाचे समन्स
3 भारत,चीनचे सैन्य लडाखमधून मागे
Just Now!
X