15 October 2019

News Flash

Video : राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंवर शरद यादवांची वादग्रस्त टिपण्णी

अलवर येथील मुंडावर मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये त्यांनी ही टिपण्णी केली.

शरद यादव यांनी राजस्थानच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर वादग्रस्त टिपण्णी केली.

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एका सभेत माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर एक वादग्रस्त टिपण्णी केली. अलवर येथील मुंडावर मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये त्यांनी ही टिपण्णी केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.


‘वसुंधरा राजे आमच्या मध्य प्रदेशची कन्या आहेत. त्यांना आता विश्रांती द्या, त्या खूपच थकल्या असून खूप जाड झाल्या आहेत, यापूर्वी त्या चांगल्या बारीक होत्या.’ अशा स्वरुपाचे विधान शरद यादव यांनी भर सभेत केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरु झाला.

दरम्यान, शरद यादव यांनी यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. यापूर्वी २४ जानेवारी २०१७ रोजी पाटणामधील एका प्रचार सभेत शरद यादव म्हणाले होते की, मताची इज्जत मुलीच्या इज्जतीपेक्षा मोठी असते. त्यांच्या या विधानावरुन टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्याला असे म्हणायचे नव्हते, तर मुलीवर जसे प्रेम करता तसे मतांवरही प्रेम करा, असे म्हणायचे होते अशी सारवासारव केली होती.

First Published on December 6, 2018 8:23 pm

Web Title: sharad yadav derogatory comment on vasundhra raje in alwar rajasthan watch video