News Flash

“शरजिल इमामच्या भाषणाची सुरूवात अस्सलाम आलेकुमनं झाली याचा अर्थ…”, सरकारी वकिलांचा युक्तिवाद

शरजिल इमामच्या जामिन याचिकेवर दिल्लीच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील आणि बचाव पक्षाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला.

Sharjeel-Imam
(Photo- Indian Express)

दिल्ली हिंसाचार प्रकरणी आरोपी असलेल्या शरजिल इमामच्या जामिन याचिकेवर दिल्लीच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील आणि बचाव पक्षाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. शरजिलवर चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप आहे. तसंच देशद्रोहाचा आरोपही त्याच्यावर आहे. या प्रकरणी दिल्लीच्या कडकडडूमा कोर्टात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. शरजिल इमामची भाषणं ही अराजकता पसरवणारी होती असा दावा सरकारी वकिलांनी कोर्टात केला. आपण काय बोलतो याची जाणीव शरजीलला असल्याचं देखील वकिलांनी कोर्टात सांगितलं. भाषणाची सुरूवात अस्सलाम आलेकुमनं केली यावरूनच त्याचा हेतू सिद्ध होतं, याकडेही वकिलांनी लक्ष वेधलं. ते वाक्य एका समुदायाला उद्देशून होतं, यावरून स्पष्ट होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

“इमामचे जामिया मिलिया इस्लामिया आणि विशेषत: जानेवारी २०२० मध्ये अलीगढ मुस्लिम विद्यापीठात दिलेली भाषणे एका विशिष्ट समुदायासाठी होती.”, असा युक्तिवाद सरकारी वकील अमित प्रसाद यांनी न्यायाधीशांसमोर केला. “शरजिल साधारण पार्श्वभूमी असलेल्या आरोपी नाही. तो पॉकेटमार, ड्रग्स तस्करी करणारा नाही. त्याला चांगलं भाषण देता येतं. त्याला पाच भाषांचं ज्ञान आहे. त्याच्या जामिया विद्यापीठ आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठाती भाषणं पाहिली, तर त्यातून तीन गोष्टी स्पष्ट होतात. एका विशिष्ट समुदायाला चेतवण्यासाठी केल्याचं स्पष्ट होतं. तसेच यातून अराजकता पसरवण्याचा त्याचा हेतू होता”, असं सरकारी वकिलांनी कोर्टासमोर सांगितलं.

याआधी इमामच्या वकिलांनी त्याच्या जामीनासाठी जोरादार युक्तिवाद केला होता. “त्याची भाषणं नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात होती. तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे तो देशद्रोह ठरू शकत नाही”, असा दावा इमामच्या वकिलांनी केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2021 7:14 pm

Web Title: sharjeel imam starting speech for particular community say advocate rmt 84
Next Stories
1 GDP Failure : मोदींनी काँग्रेसकडे यावं, आमचे अर्थतज्ज्ञ मदत करतील – राहुल गांधी
2 अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या २० वर्षांचं व्लादिमिर पुतिन यांनी केलं एका शब्दात वर्णन, म्हणाले,…
3 सापाच्या विषामुळे नष्ट होणार करोना विषाणू; शास्त्रज्ञांनी केला दावा