News Flash

अभिनेता शर्मन जोशीच्या वडिलांचे निधन

ते ८४ वर्षांचे होते

बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशी याचे वडील अरविंद जोशी यांचं आज सकाळी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अरविंद जोशी यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अभिनेते परेश रावल यांनी ट्वीट करत अरविंद यांच्या निधनाची माहिती दिली. ‘भारतीय रंगभूमीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मला सांगताना दु:ख होत आहे की, अभिनेते अरविंद जोशी यांचे निधन झाले आहे,’ असं म्हणत त्यांनी ही दुःखद वार्ता दिली.

अरविंद जोशी यांनी गुजरातीमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये तसेच नाटकांमध्ये काम केलेलं आहे. गुजराती नाटकांमधून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. गुजरातीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही त्यांनी काम केलं. ‘इत्तेफाक’, ‘शोले’, ‘अपमान की आग’, ‘खरीदार’, ‘ठिकाना’, ‘नाम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सहकलाकार म्हणून काम केले आहे. त्यांनी हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 11:47 am

Web Title: sharman joshi father gujarati actor arvind joshi passes away avb 95
Next Stories
1 कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे; दिल्लीतील हिंसाचारावर राष्ट्रपतींनी व्यक्त केली नाराजी
2 एमआयएमच्या पाचही आमदारांनी घेतली नितीश कुमारांची भेट; ओवेसींना बसणार झटका?
3 कुत्रीला पाच पिल्लं झाल्याच्या आनंदात मालकाने १२ गावातील लोकांना घातलं गावजेवण
Just Now!
X