News Flash

शशी थरूरनी मुख्यमंत्र्यांना विचारला प्रश्न; आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर

शरुर यांनी ट्विटरवरुन मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला.

शशी थरूरनी मुख्यमंत्र्यांना विचारला प्रश्न; आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर

करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन झाल्यामुळे केरळचे खासदार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केरळमधील ट्रक चालकांबाबत एक प्रश्न विचारला. या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर न देता मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. शरुर यांनी ट्विटरवरुन मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला.

“मोठ्या प्रमाणावर केरळमधील ट्रक चालक गुजरातमध्ये फळं आणि भाजीपाला पोहोचवून रिकाम्या वाहनांनी आपल्या घरी परतत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील लॉकडाऊनमुळे ते भिवंडी येथे अन्नपाण्याविना तसेच टॉयलेटच्या सुविधेशिवाय अडकून पडले आहेत. त्यांना केरळला जाण्यासाठी महाराष्ट्र सरकार आपल्या पोलिसांना सहानुभूतीपूर्वक सूचना देऊ शकते का? असा प्रश्न खासदार शशी थरुर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटरवरुन विचारला.

मात्र, शरुर यांच्या प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन उत्तर दिलं. आदित्य ठाकरे म्हणाले, गुजरातची सीमा पार केल्यानंतर ते महाराष्ट्राच्या हद्दीत अडकले होते. त्यांची तपासणी करुन त्यांना काल रात्रीच पुढे जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. जर त्यांना इतर काही अडचणी असतील तर आम्हाला कृपया याची माहिती द्या, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 5:53 pm

Web Title: shashi tharoor asks question to cm uddhav thackarey gives him answer from cms minister son aditya thackeray aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महाभारताचं युद्ध १८ दिवसांत जिंकलं होतं, करोनाचं २१ दिवसांत जिंकायचंय – पंतप्रधान
2 ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स करोना पॉझिटिव्ह; राजघराण्यापर्यंत पोहचला संसर्ग
3 Coronavirus: पहिल्या टप्प्यातील जणगणना, एनपीआर प्रक्रिया ढकलली पुढे