News Flash

सुमित्रा महाजन यांच्या निधनाच्या अफवेने गोंधळ; शशी थरुर यांनी मागितली माफी

रात्री सुमित्रा महाजन यांच्यासंदर्भात अनेक ट्विट करण्यात आल्यानं त्याचं नाव ट्रेण्डमध्ये होतं

काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी गुरुवारी रात्री केलेल्या एका ट्विटमुळे चांगलाच गोंधळ उडला. थरुर यांनी ट्विटरवरुन लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचा मृत्यू झाल्याचं ट्विट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र मध्य प्रदेश भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी ट्विट करुन सुमित्रा महाजन यांची प्रकृती ठणठणीत असून चिंता करण्याची गरज नाही असं म्हटलं. यानंतर थरुर यांनी माफी मागत आपलं ट्विट डिलीट केलं. मात्र थरुर यांच्या या ट्विटमुळे प्रसारमाध्यमांपासून ते अनेक व्हेरिफाइड अकाऊंट असणाऱ्या नेत्यांनी सुमित्रा महाजन यांच्या मृत्यूसंदर्भात चुकीच्या माहितीच्या आधारे ट्विट केलं. यामुळेच सुमित्रा महाजन यांच्या संदर्भातील हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेण्ड होता.

थरुर यांनी गुरुवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास सुमित्रा महाजन यांचा फोटो ट्विट करत त्यांचं निधन झाल्याचं ट्विटरवर म्हटलं. थरुर यांनी महाजन यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली.

मात्र त्यानंतर ११ वाजून ३३ मिनिटांनी कैलास विजयवर्गीय यांनी थरुर यांचं ट्विट कोट करुन रिट्विट करत, “ताई एकदम ठणठणीत आहेत, देव त्यांना दिर्घायुष्य देवो,” असं ट्विट केलं.

या ट्विटवर थरुर यांनी रिप्लाय केला. “धन्यवाद कैलास विजयवर्गीय. मी माझं ट्विट दिलं आहे. लोकं अशा बातम्या कोणत्या वाईट विचारसणीने पसरवतात कळत नाही. मी सुमित्राजींच्या आरोग्यदायी आणि दिर्घायुष्यासाठी प्रादर्थना करतो,” असं थरुर म्हणाले.

नंतर परत एक ट्विट करताना थरुर यांनी, “सुमित्र महाजन यांची प्रकृती उत्तम आहे ऐकून समाधान वाटलं. मला एका व्यक्तीकडून ही माहिती मिळाली होती जी मला खरी वाटली. चूक सुधारली आणि आणि यावरुन बातमी करणाऱ्यांनाही ती सुधावारी असं आवाहन करतो,” असं म्हटलं होतं.

रत्नागिरीच्या आहेत सुमित्रा महाजन…

सुमित्रा महाजन या इंदूर लोकसभेच्या खासदार राहिल्या आहेत. त्यांनी १९८९ पासून सलग ८ वेळा इंदूरमधून निवडणृक लढवलीय. १९८४-८५ या काळात त्यांना इंदूरच्या उपमहापौरपदी नियुक्त करण्यात आलं. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाला पत्र लिहीत निवडणूक लढवायची नसल्याचं सांगत सक्रीय राजकारणातून बाहेर पडण्याचं जाहीर केलं होतं. सुमित्रा महाजन यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणचा आहे. त्यांचं कुटुंब काही वर्षांपूर्वी मुंबईत येऊन स्थायिक झालं. इंदूरचे अधिवक्त जयंत महाजन यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर त्या इंदूरमध्येच स्थायिक झाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 10:27 am

Web Title: shashi tharoor falls for sumitra mahajans death hoax deletes tweet after bjp neta reacts scsg 91
Next Stories
1 धक्कादायक! दिल्लीत ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने २५ रुग्णांचा मृत्यू
2 विरार रुग्णालय आग : मृतांच्या नातेवाईकांना सात लाखांची मदत; पंतप्रधान मोदी, पालकमंत्र्यांची घोषणा
3 रुग्णविस्फोट!
Just Now!
X