20 October 2020

News Flash

हे पाकिस्तानचे कार्यालय म्हणत भाजयुमोकडून शशी थरूर यांच्या कार्यालयाची तोडफोड

थरुर यांचे नाव असलेल्या साईनबोर्डची तोडफोड करीत त्याऐवजी थरुर यांचे पाकिस्तानातील कार्यालय असा मजकूराची पाटी त्याजागी लावण्यात आली.

त्रिवेंद्रम : भारतीय जनता युवा मार्चाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्या कार्यालयावर हल्ला करीत तोडफोड केल्याचे वृत्त आहे.

भारतीय जनता युवा मार्चाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्या कार्यालयावर हल्ला करीत तोडफोड केल्याचे वृत्त आहे. भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास भारताचा हिंदू पाकिस्तान होईल या शरुर यांच्या विधानाचा निषेध करताना हा हल्ला करण्यात आला आल्याचे सुत्रांकडून कळते.


पोलिसांच्या माहितीनुसार, भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी निषेध दर्शवताना थरुर यांच्या कार्यालयाबाहेर प्रवेशद्वारावर काळे तेल ओतले. त्यावर काळा झेंडा लावण्यात आला. तसेच थरुर यांचे नाव असलेल्या साईनबोर्डची तोडफोड करीत त्याऐवजी थरुर यांचे पाकिस्तानातील कार्यालय असा मजकूराची पाटी त्याजागी लावण्यात आली. हा हल्ला झाला त्यावेळी थरुर त्यांच्या कार्यालयात उपस्थित होते. या प्रकारानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचताच कार्यकर्ते ठिकाणाहून पळून गेले. दरम्यान, अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना थरुर म्हणाले, लोक आपल्या समस्या घेऊन माझ्या कार्यालयात आले होते. मात्र, त्यांना भिती दाखवून पळवून लावण्यात आले. देशात आपल्याला हेच पाहिजे आहे का? हे मी एक खासदार म्हणून नव्हे तर नागरीक म्हणून सांगत आहे. हे ते हिंदुत्व नव्हे जे मला माहिती आहे, असेही थरुर म्हणाले.

गेल्या आठवड्यात थिरुअनंतपुरम येथील एका कार्यक्रमात बोलताना थरुर यांनी भाजपावर जहरी टीका केली होती. ते म्हणाले होते की, जर भाजपा २०१९मध्ये लोकसभा निवडणुका जिंकून पुन्हा सत्तेत आली तर देशात ते अशी परिस्थिती निर्माण करतील की ते देशाचे संविधान बदलतील. हिंदु राष्ट्र या त्यांच्या संकल्पनेप्रमाणे ते नवी घटना आणतील. त्यामुळे देशातील समता आणि अल्पसंख्यांक नष्ट होईल आणि भारत हिंदू पाकिस्तान म्हणून ओळखला जाईल. थरुर यांच्या या वक्तव्याचे मोठे राजकीय पडसाद उमटले होते. भाजपाने थरुर यांच्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 5:44 pm

Web Title: shashi tharoor office attacked allegedly by bjp workers in keralas trivandrum
Next Stories
1 एअर होस्टेस आत्महत्या: आई-वडिलांनी नवऱ्याला दिली होती BMW कार, हिऱ्याची अंगठी
2 कॅन्सरग्रस्त पतीशी शरीरसंबंधास नकार, पत्नीची हत्या
3 ३६५ दिवसांमध्ये ३ हजार ५९७ बळी… भारतात खड्ड्यांचीच ‘दहशत’
Just Now!
X