News Flash

WhatsApp वरील फेक फोटोचे बळी ठरले शशी थरूर; मान्य केली चूक

थरूर यांनी शेअर केलेला फोटो १९५४ सालीचा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ह्युस्टनमधील हाउडी मोदी कार्यक्रमावरून अनुकूल व प्रतिकूल अशा दोन्ही प्रतिक्रियांची लाट आली आहे. विरोधकांचा मुख्य रोष मोदींच्या धोरणांवर होता. मात्र, काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनी मोदींना लाभलेली गर्दी ही पब्लिसिटी, मार्केटिंग आदींचा मेळ असल्याचे अप्रत्यक्षरीत्या सांगत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पण ज्या फोटोच्या आधारावर थरूर यांनी मोदींवर टीका केली तो WhatsApp वरील फेक फोटो असल्याचे समोर आले आहे.  थरूर यांनीच हा फोटो चुकीचा असल्याचे ट्विटरवरून सांगितले आहे. तो फोटो मला पाठवण्यात आला होता आणि तो अमेरिकेतील नव्हे तर सोव्हिएत युनियनमधील आहे, असा खुलासा थरूर यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. तर शेहला रशीदनं मोदींना काश्मीरी तसेच खलिस्तानवादी निदर्शनांच्या माध्यमातून विरोध करत असल्याची ट्विटची मालिका केली होती. यात काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनीही  माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा परदेशी दौऱ्यातील एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता. “नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे १९५४ मधील हे छायाचित्र आहे. बघा, कोणताही प्रचार न करता, अनिवासी भारतीयांच्या गर्दीचं व्यवस्थापन न करता किंवा माध्यमातून प्रचार न करता किती उत्साहाने अमेरिकन नागरिक नेहरूंच्या स्वागतासाठी आली होती,” असं थरूर म्हणाले होते.

परंतु हा फोटो अमेरिकेतील नसल्याचा खुलासा खुद्द शशी थरूर यांनीच केला आहे. “मी सांगितलेला फोटो मला पाठवण्यात (फॉरवर्ड) आला होता. तो फोटो अमेरिकेतील नसून सोव्हिएत युनियनमधील आहे. हे काही असलं तरी माझ्या मतावर ठाम आहे. देशाच्या माजी पंतप्रधानानींही परदेशात लोकप्रियतेचा अनुभव घेतला आहे. जसा सन्मान मोदींना मिळत आहे. पंतप्रधानांना मिळालेला सन्मान हा देशाबद्दलचा आदर आहे,” असं थरूर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 12:41 pm

Web Title: shashi tharoor show neharu indira gandhi photograph and critisied modi bmh 90
Next Stories
1 गोव्यात न्यूड पार्टीचे पोस्टर्स; पोलिसांनी सुरू केला तपास
2 पोलिसांना चौकशीदरम्यान स्थावर मालमत्ता जप्तीचा अधिकार नाही – सुप्रीम कोर्ट
3 सोने, चांदी नाही तर आठ लाखांचा कांदा चोरीला, व्यापाऱ्याची पोलिसांत तक्रार
Just Now!
X