काँग्रेसचे नेते आणि लेखक शशी थरूर यांचं इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व सर्वपरिचित आहे. पण, दहावीत शिकणाऱ्या मुलीची इंग्रजी ऐकून थथी थरूर यांची विकेट पडली. महत्त्वाचं म्हणजे या मुलीनं उच्चारलेला इंग्रजी शब्द ऐकून थरूर यांनीच तिला ‘याचा अर्थ काय होतो’, असा प्रश्न केला.

शशी थरूर यांची इंग्रजी ऐकून लोक हैराण होतात. कारण थरूर यांची इंग्रजी समजून घेण्यासाठी शब्दकोशाचीच मदत घ्यावी लागते. पण केरळमधील दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीनं उच्चारलेला शब्दच कळाला नाही. हा शब्द ऐकून थरूर यांच्या चेहरा प्रश्नार्थक झाला. दिया असं या विद्यार्थीनीचं नाव आहे.

केरळ क्लब एफएमच्या एका रेडिओ स्टेशनवर दियाला आपल्या इंग्रजी कौशल्याचं सादरीकरण करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. या कार्यक्रमात खासदार शशी थरूर सहभागी झाले होते. या कार्यक्रमात थरूर यांनी तिचं प्रचंड कौतुक केलं.

दियानं एक मोठा एकाच दमात उच्चारला. तो ऐकून थरूर अवाक् झाले. पूर्ण शब्द ऐकल्यानंतर थरूर यांनीच “या शब्दाचा अर्थ काय आहे?,” असा प्रश्न दियाला केला. हा अनुभव थरूर यांनी ट्विट सगळ्यांशी शेअर केला आहे. “दहावीतील गुणवंत दियाची कहाणी भारी आहे. ती जीभ वळवण्यात प्रविण आहे. मी हे शब्द कधीही ऐकलेले नाहीत. त्यावर मी आश्चर्यही व्यक्त केलं आहे,” असं थरूर यांनी म्हटलं आहे.

दियाने जो शब्द उच्चारला होता. त्यावर थरूर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला दियानं उत्तरही दिलं आहे. हे एका काल्पनिक खाद्य पदार्थाचं नाव असल्याचं तिने सांगितलं. “शब्द लक्षात ठेवून, तो पुन्हा म्हणणं ही छोटी गोष्ट नाही. प्रत्येक व्यक्ती यामध्ये यशस्वी होत नाही. ज्यांच्याकडे स्मरणशक्ती आहे. एकाग्रता आहे. त्यांनी असे मोठे शब्द वापरण्यासाठी शिकायला हवे,” अशा शब्दात थरूर यांनी दियाची पाठ थोपटली.