देशाचं संरक्षण करताना दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या लष्कारातील सहा जवानांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्काराची घोषणा करण्यात आली. लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा, मेजर कोंजेंगबम बिजेंद्र सिंह, नायब सुभेदार नरेंद्र सिंह, नायब सुभेदार सोमबीर, नाईक नरेश कुमार, शिपाई करमदेव ऑरिअन यांना शौर्य चक्र जाहीर झाले आहे. देशाच्या सुरक्षा करताना असामान्य कामगिरी बजावणाऱ्या लष्कारातील जवानांना शौर्य चक्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. २०१९मध्ये कर्तव्यावर असताना दहशतवाद्यांशी मुकाबला करत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहा जवानांना शौर्य चक्र जाहीर झाले आहे. लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा, मेजर कोंजेंगबम बिजेंद्र सिंह, नायब सुभेदार नरेंद्र सिंह, नायब सुभेदार सोमबीर, नाईक नरेश कुमार, शिपाई करमदेव ऑरिअन यांचा गौरव करण्यात येणार आहे. लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा यांनी मणिपूरमध्ये दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एक माहिती नेटवर्क तयार केलं. याच बळावर त्यांच्या नेतृत्वाखाली तुकडीनं १४ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. Army Vice Chief Lt Gen SK Saini, Northern Army Commander Lt Gen Ranbir Singh and Adjutant General Lt Gen Arvind Dutta among 19 officers to be awarded the Param Vishisht Seva Medal (PVSM) on #RepublicDay pic.twitter.com/fD8ooVez5p — ANI (@ANI) January 25, 2020 याचबरोबर उप लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल एस.के. सैनी, लष्काराचे ईशान्येकडील कमांडर लेफ्टनंट जनरल रनबीर सिंह, सहाय्यक लेफ्टनंट जनरल अरविंद दत्ता यांच्यासह १९ अधिकाऱ्यांना परम विशिष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे.