12 July 2020

News Flash

दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल विरुद्ध शाझिया इल्मी?

आम आदमी पक्षाला रामराम ठोकलेल्या शाझिया इल्मी यांना 'आप'चे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक आखाड्यात उतरविण्याचा विचार भाजप करत असल्याचे म्हटले जात आहे.

| January 14, 2015 05:35 am

आम आदमी पक्षाला रामराम ठोकलेल्या शाझिया इल्मी यांना ‘आप’चे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक आखाड्यात उतरविण्याचा विचार भाजप करत असल्याचे म्हटले जात आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत येत्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱया विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला दणका देण्यासाठी केजरीवाल यांना आव्हान देण्यासाठी भाजप दमदार चेहऱयाच्या शोधात आहे. यामध्ये शाझिया इल्मी यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नव्हे तर, शाझिया इल्मी यांनीही केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. हे दोघेजण एकमेकांविरोधात उभे ठाकल्यास नवी दिल्ली मतदार संघातील ही सर्वात लक्षवेधी लढत ठरणार आहे.
इल्मी यांनी गेल्या वर्षी ‘आप’मध्ये लोकशाहीचा अभाव असल्याचे सांगत राजीनामा दिला होता. इल्मी यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. निवडणूक आयोगाने सोमवारी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2015 5:35 am

Web Title: shazia ilmi likely to join bjp may contest against arvind kejriwal in delhi polls
Next Stories
1 माझ्याच सांगण्यावरून डीआरडीओच्या प्रमुखांची हकालपट्टी – पर्रिकर
2 संघटनात्मक पदांसाठी कालमर्यादा निश्चितीचा प्रस्ताव
3 वाचनकौशल्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची अधोगतीकडे वाटचाल!
Just Now!
X