जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्षा शेहला रशीद आपल्या सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे नेहमी चर्चेत असते. यावेळी ट्विटरद्वारे शेहलाने काश्मीर मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारने 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला. त्यानंतर या राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासीत प्रदेश केले. तेव्हापासून काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने इंटरनेट, टेलिफोन सेवेवर निर्बंध आणले. अजूनही तेथील इंटरनेट सेवा पूर्ववत झालेली नाही. याच मुद्द्यावरुन शेहला रशीदने केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

ख्रिसमसनिमित्त सांताक्लॉजकडे गिफ्ट मागताना शेहलाने, ”डिअर सांताक्लॉज कृपया आम्हा काश्मिरींना पुन्हा इंटरनेट सुरू करुन द्या,” अशी मागणी केली आहे.