28 March 2020

News Flash

फोटो मॉर्फ करणाऱ्या विरोधात शेहला रशिदची दिल्ली पोलिसांकडे धाव

माझी मानसिक छळवणूक करणाऱ्या व्यक्तीवर तुम्ही कारवाई करणार का? दिल्ली पोलिसांना केला सवाल

जम्मू-काश्मीर पिपल्स मुव्हमेंटची नेता आणि जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्षा शेहला रशिदने तिचा फोटो मॉर्फ करणाऱ्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली आहे.

तोकड्या कपड्यांमध्ये असलेल्या शेहला रशिदची एक डॉक्टर तपासणी करत असल्याचा फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. शिवाय या फोटोला ओळ देण्यात आली आहे की, अमेरिकेतील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. जनार्दन सिन्हा हे काश्मीरमधील गोळीबारात जखमी झालेल्या शेहला रशिदवर उपचार करत आहेत.

यावरून शेहला रशिदने दिल्ली पोलिसांकडे कारवाईसाठी धाव घेतली आहे. तिने संबंधित फोटो शेअर करत, माझ्या छायाचित्रात संगणकीय बदल करून अश्लिल प्रतिमा तयार करणाऱ्या व माझी मानसिक छळवणूक करणाऱ्या व्यक्तीवर तुम्ही कारवाई करणार का? असा सवाल केला आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंटही केलेल्या आहेत.

ट्विटरवर काश्मीरमधील परिस्थितीबाबत खोटे मेसेज पसरवण्याच्या आरोपाखाली शेहला रशिदविरोधात मागील आठवड्यातच देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सोमवारी दिल्लीच्या कोर्टाने शेहला रशिदला अटकेपासून दिलासा दिला आहे. पटियाला हाऊस कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पवन कुमार जैन यांनी शेहलाला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2019 6:15 pm

Web Title: shehla rashid runs to delhi police against photo morphing msr 87
Next Stories
1 छत्तीसगड : लाखोंचे बक्षीस असलेल्या कमांडर, डेप्युटी कमांडरसह सहा नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
2 नरेंद्र मोदींचा हल्लाबोल, दहशतवादाची पाळमुळं पाकिस्तानात
3 मोहन भागवत यांच्या ताफ्यातील कारच्या धडकेत सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू
Just Now!
X