उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका पुढीलवर्षी असल्यातरी आतापासूनच सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसने उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री पदाचा ब्राह्मण उमदेवार देण्याची शिफारस केल्यानंतर काँग्रेसनेही लगोलग दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांना उत्तर प्रदेशच्या रणांगणात उतरवले. पण काँग्रेसची ही चाल अनेकांना रूचलेली दिसत नाही. समाजवादी पक्षाचे खासदार अमरसिंह यांनी शीला दिक्षीत या पंजाबी असल्याचे सांगत नव्या चर्चेला सुरूवात केली आहे. परंतु दिक्षीत यांनीही अमरसिंह यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देत आपण ब्राह्मणच असल्याचा खुलासा केला आहे.
अमरसिंह यांनी काँग्रेसवर ब्राह्मण कार्ड खेळले जात असल्याचा आरोप करून शीला दिक्षीत या ब्राह्मण नसल्याचा दावा केला होता. त्यावर शीला दिक्षीत यांनी खुलासा केला. मी विवाहापूर्वी पंजाबी होते. माझा विवाह उत्तर प्रदेशातील ब्राह्मण कुटुंबात झाला आहे. लग्नानंतर सासरच विवाहितेचे घर असते असे म्हणत मी ब्राह्मण कुटुंबीयांची सून असल्याची त्यांनी सांगितले.
फुटीरवादी देश तोडत आहेत
काश्मीर समस्येबाबत बोलताना शीला दिक्षीत म्हणाल्या, फुटीरवादी लोक देशाला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारने काश्मीर समस्येवर मात करण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 8, 2016 8:12 am