News Flash

लग्नासाठी मुलगी कोर्टात आली आणि कुटुंबीयच ओरडले, आमची मुलगी करोना पॉझिटिव्ह त्यानंतर…

असं का केलं?

प्रतिकात्मक छायाचित्र

एखाद्या व्यक्तीला खोकला आला किंवा त्याला शिंक जरी आली, तरी लोक त्याच्यापासून चार हात लांब पळतात. असाच प्रकार रविवारी मध्य प्रदेशच्या कोर्टात घडला. इथे एक महिला तिच्या पसंतीच्या मुलासोबत लग्न करण्यासाठी आली होती. पण तिच्या कुटुंबीयांनीच या लग्नामध्ये खोडा घातला.

ही मुलगी कोर्टामध्ये आली, त्यावेळी तिचे नातेवाईकही तिथे पोहोचले. मुलीच्या नातेवाईकांनी आमची मुलगी करोना व्हायरस पॉझिटिव्ह आहे, असा मोठमोठयाने ओरडाओरडा सुरु केला. त्यानंतर कोर्टात एकच गडबड, गोंधळ सुरु झाला. लग्न करण्यासाठी म्हणून मुलगी मुलासोबत मध्य प्रदेशच्या खांडवा येथील कोर्टात आली होती. ते रजिस्टर पद्धतीने लग्न करणार होते. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

विवाह नोंदणीच्या कागदपत्रावर आपले नाव सांगण्याआधीच या मुलीचे नातेवाईक कोर्टात पोहोचले व त्यांनी आमच्या मुलीला करोना व्हायरस झालाय असा आरडाओरडा सुरु केला. ते ऐकताच मुलाचे कुटुंबीय त्याला क्वारंटाइन करण्यासाठी घेऊन गेले. तिथे उपस्थित असणारे वकिल, टायपिस्टही या मुलीपासून लांब जाऊन उभे राहिले व पुढे काहीही टाइप करायला नकार दिला.

पुढच्या प्रक्रिया करण्याआधी करोना चाचणी करुन ये, असे वकिलांनी त्या मुलीला सांगितले. जिल्हा आरोग्य विभागानुसार, मुलीला करोनाची लागण झाल्याचा कुठलाही रिपोर्ट नाहीय. कोर्ट मॅरेजसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तरुणी आणि तरुण कोर्टात आले होते. मुलाच्या कुटुंबीयांना मुलगी पसंत आहे पण मुलीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध आहे. मुलगा-मुलगी दोघे वकिलांबरोबर बोलत असताना मुलीच्या कुटुंबीयांनी गोंधळ घातला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 4:29 pm

Web Title: shes coronavirus positive yells kin of mp woman to stop her court marriage dmp 82
Next Stories
1 शिवसेनेचं अधःपतन, उद्धव ठाकरेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे ढोंगीपणा – विहिंपची टीका
2 राजस्थान सत्ता संघर्ष : काँग्रेसच्या मागणीला अखेर यश
3 धक्कादायक! बेपत्ता करोना रुग्णाचा रुग्णालयाजवळच मृतदेह सापडल्याने खळबळ
Just Now!
X