पाकिस्तानातील अल्पसंख्याक शियापंथीय वकिलाची बुधवारी येथे अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली. हा वांशिक हिंसाचाराचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर वकिलाने यापूर्वी ‘एमक्यूएम’ संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांचे वकिलपत्र घेतले होते.
सदर वकिलाचे नाव अली हासनैन बुखारी असे असून ते सकाळी आपल्या कार्यालयाकडे निघाले असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा बंदूकधाऱ्यांनी कोरांगी परिसरात त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये ते जागीच ठार झाले. एमक्यूएम’ या संघटनेच्या कायदेशीर सहकार्य समितीचे ते सदस्य होते आणि त्यांनी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांना मदत केली होती. संघटनेने या हत्येचा निषेध केला असून हल्लेखोरांना त्वरित अटक करावी, अशी मागणी केली आहे.