मुस्लीम समाजाच्या मालमत्तांचे काळजीवाहक असलेल्या, २७ मुटवालिसांची शिया केंद्रीय वक्फ मंडळाने हकालपट्टी केली आहे. हकालपट्टी केलेल्यांत मौलाना कालबे जावाद व काँग्रेसचे आमदार नवाब काझिम अली यांचा समावेश असून ते उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आझम खान यांचे विरोधक  आहेत. वक्फ मंडळाचे प्रशासकीय अधिकारी सय्यद गुलाम सय्यदेन रिझवी यांनी सांगितले की, जवाद यांच्याविरोधात दोन प्रकरणात खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे. लखनौतील साज्जागिया कादीम, जदीद व इमामबारा झाउलाल, तसेच राउ ए सरकार या मालमत्तांच्या काळजीवाहक पदावरून त्यांना काढण्यात आले आहे.
आझम खान यांच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे असे जवाद यांचे म्हणणे आहे. मंडळाने आपल्याविरोधात आरोप सिद्ध करावेत नाहीतर आपण कायदेशीर कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
जवाद व आझम खान यांनी एकमेकांवर दोषारोप केले असून इतर काळजीवाहकांचीही चौकशी सुरू केली आहे, अस वक्फ मंडळाचे प्रशासकीय अधिकारी  रिधवी यांनी सांगितले. सुअर नवाब येथील आमदार काँग्रेसचे आमदार काझिम अली हे आझम खान यांचे कट्टर विरोधक असून रामपूरच्या वक्फ मंडळावरून त्यांना काढून टाकण्यात आले आहे.यातील बऱ्याच वक्फ मालमत्ता  या लखनौ, बरेली, रामपूर, बिजनोर, मुझफ्फरनगर व मीरत येथे आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, या सर्व ठिकाणी नवीन काळजीवाहक नेमले आहेत. जवाद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा आरोप केला की, आम्ही खान यांच्या विरोधात असल्याने राजकीय सूडाच्या भावनेतून ही कारवाई करण्यात आली आहे. रौफ ए सरकारे हुसेनचे काळजीवाहक मौलान रझा हुसेन यांना आझम खान यांच्या विरोधात तक्रार केल्यावरून काढून टाकण्यात आले आहे. शिया व सुन्नी मंडळे एकत्र करण्याचा आझम खान यांचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.