News Flash

शिंदे यांचे कानावर हात

दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी एका मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणी फाशीची शिक्षा झालेला गुन्हेगार मुकेश सिंग याची

| March 5, 2015 12:34 pm

दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी एका मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणी फाशीची शिक्षा झालेला गुन्हेगार मुकेश सिंग याची बीबीसीकरिता मुलाखत घेण्यासाठी चित्रपट निर्मातीस गृहमंत्रालयाने परवानगी दिली. त्यावेळी यूपीएचे सरकार सत्तेवर होते व सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होते पण त्यांनी आपण अशी कुठलीही मुलाखत घेण्यास परवानगी दिली नव्हती असे सांगून हात झटकले.
    गृहमंत्रालयातील सहसचिव दर्जाचे अधिकारी सुरेश कुमार यांनी ही परवानगी दिली होती व तसे पत्र निर्मात्यांना दिले होते, असे गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
शिंदे यांनी सांगितले की, आपण अशी कुठलीही परवानगी दिलेली नाही, त्याचे कुठलेही कागद आपल्याकडे आले नव्हते व त्याची आपल्याला माहिती नाही.
ते म्हणाले की, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनाही दोष देऊ नका त्यांनी माझे नाव घेतलेले नाही, तुम्ही माझे नाव घेता आहात हे चूक आहे.
त्यांनी सांगितले की, आपण संसदेचे कामकाज बघितले आहे, राजनाथ सिंह यांनी आपले नाव घेतलेले नाही. राज्यसभेचे कामकाज आपण पाहिले त्यातही त्यांनी आपले नाव घेतले नाही. कुणीतरी परवानगी दिली असेल पण आपल्याला त्या बाबत माहिती नाही.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्रालयातील सहसचिव दर्जाचे अधिकारी सुरेश कुमार यांनी ही परवानगी दिली होती व तसे पत्र निर्मात्यांना दिले होते व सरकारची तिहार तुरुंगात त्या गुन्हेगाराची मुलाखत घेण्यास काही हरकत नाही असे त्यांनी कळवले होते. राजनाथ सिंह यांनी सांगितले की, ही परवानगी देताना अनेक अटी घातल्या होत्या. त्यांचा संबंधित निर्मातीने भंग केला आहे आता या परवानगीबाबत जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशी केली जाईल.
पत्रकारांचा माईक ढकलला
सुशीलकुमार शिंदे हे अभिनेते मंछू मनोज यांच्या विवाहासाठी येथे आले होते. मंछू हे राज्यसभेचे माजी खासदार मोहन बाबू यांचे पुत्र आहेत. यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारले असता मोहन बाबू यांनी टीव्ही पत्रकारांचा माईक ढकलून लावला व शिंदे हे येथे खासगी भेटीसाठी आले आहेत असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2015 12:34 pm

Web Title: shinde in denial on giving permission for nirbhaya documentary shoot
टॅग : Sushil Kumar Shinde
Next Stories
1 ..तर बँका, वित्तीय संस्थांवरही नव्या कायद्यानुसार कारवाई
2 चीनच्या संरक्षण तरतुदीत दहा टक्के वाढ
3 इस्रोच्या दिशादर्शन उपग्रहाचे उड्डाण लांबणीवर
Just Now!
X