16 December 2019

News Flash

शिर्डी एक्स्प्रेसचा डब्बा रुळावरून घसरला

तिरुपतीवरून शिर्डीकडे जाताना कोडूर रेल्वेस्थानकावर सकाळी घडली घटना

आंध्र प्रदेशमधील कडपा जिल्ह्यातील कोडूर रेल्वेस्थानकावर आज सकाळी शिर्डी एक्स्प्रेसचा एक मोठा अपघात टळला. सुदैवाने सर्व रेल्वे प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वेचा एक डब्बा रुळावरून घसरला होता, मात्र हे समजताच रेल्वे चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ रेल्वे थांबवल्याने अपघात टळला.

प्राप्त माहितीनुसार आज सकाळी १० वाजेच्या सुमारास शिर्डी एक्स्प्रेस कोडूर रेल्वेस्थानकावर पोहचत असताना, रेल्वेच्या शेवटच्या डब्ब्याचे चाक रुळावरून घसरले. यानंतर रेल्वेच्या गतीत बिघाड झाल्याचे लक्षात येताच, रेल्वे चालकाने तात्काळ रेल्वे थांबवली व अपघात टळला.

घटनेची माहिती मिळाताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर रेल्वेचा घसरलेला डब्बा पुन्हा रुळावर आणण्याचे कार्य सुरू झाले होते. या घटनेमुळे या मार्गावर धावणाऱ्या अन्य रेल्वेंचे वेळापत्रक मात्र काहीसे कोलमडले.

First Published on December 3, 2019 3:53 pm

Web Title: shirdi express from tirupati to shirdi got derailed at koduru railway station msr 87
Just Now!
X