‘एडीआर’च्या अहवालातील निष्कर्ष; ११६ पैकी ३३ उमेदवार कोटय़धीश
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवीत असलेल्या भाजप-शिवसेना खासदारांची मालमत्ता सरासरी ३.२० कोटी रुपयांनी म्हणजे ६० टक्क्यांनी वाढली आहे.
महाराष्ट्र इलेक्शन वॉच अॅण्ड असोसिशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉम्र्स (एडीआर)ने सात मतदारसंघात निवडणूक लढवीत असलेल्या ११६ पैकी ११५ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करून निष्कर्ष जाहीर केले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील उमेदवारांपैकी ३३ उमेदवार कोटय़धीश असून त्यांची सरासरी मालमत्ता दोन कोटी ३५ लाख रुपये इतकी आहे, १९ उमेदवारांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यापैकी १० गंभीर स्वरूपाचे आहेत.
पहिल्या टप्प्यातील उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रांमध्ये जाहीर केलेली मालमत्ता आणि त्यापैकी २०१४ मध्ये निवडणूक लढविताना जाहीर केलेली मालमत्ता यांचे तुलनात्मक विश्लेषण एडीआरने आपल्या अहवालात केले आहे. उमेदवारांची सांपत्तिक स्थिती व गुन्हेगारी पाश्र्वभूमी यांचा अभ्यास करण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 7, 2019 12:53 am