पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचे ३९ जवान शहीद झाले. या घटनेचा देशभरातून निषेध नोंदवला जातो आहे. आता याप्रकरणी शिवसेनेने संयुक्त अधिवेशनाची मागणी केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली आहे. गुरुवारी करण्यात आलेला हा हल्ला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घडवला. यानंतर सगळ्याच पक्षांनी चोख प्रत्युत्तर द्या अशी मागणी सरकारकडे केली आहे. दरम्यान या संदर्भात लोकसभा आणि राज्यसभेत संयुक्त अधिवेशन बोलावून चर्चा करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

गुरुवारी आपल्या देशाच्या लष्करावर सर्वात मोठा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संयुक्त अधिवेशन बोलवा अशी मागणी सकरकडे केली. या अधिवेशनात चर्चा होऊ शकते आणि हा भ्याड हल्ला करणाऱ्याना कसं प्रत्युत्तर दिलं पाहिजे हेदेखील ठरू शकतं असंही संजय राऊत  यांनी म्हटलं आहे.