राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश करताच त्यांचे चुलत भाऊ आणि कट्टर विरोधक डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी लगेचच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. धवलसिंह मोहिते आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. धवलसिंह मोहिते हे सध्या शिवसेनेचे सहसंपर्क नेते असून राज्याचे माजी सहकार मंत्री दिवंगत प्रतापसिंह मोहिते यांचे ते पुत्र आहेत.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी शरद पवार आणि धवलसिंह यांच्यात बंद खोलीमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. या बैठकीला अजित पवार आणि जयंत पाटील हेही उपस्थित होते.

Udayanraje Bhosale
उदयनराजे यांच्या संपत्तीत चक्क २१ कोटी रुपयांची घट
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
Ramdas Athawale
तर भाजपसोबत माझी ‘ए’ टीम : रामदास आठवले
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”

धवलसिंह यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिलेले आहे. प्रतापसिंह मोहिते आणि विजयसिंह मोहिते हे सख्खे भाऊ पण दोघांचाही पक्ष वेगळा होता. मधल्या काळात प्रतापसिंह हे भाजपात दाखल झाले होते. प्रतापसिंह मोहिते हे युती सरकारच्या काळात काही काळ सहकार मंत्रीही होते. त्यानंतर त्यांनी भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी तत्कालीन मंत्री काँग्रेसचे दिवंगत नेते आनंदराव देवकते यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपाचाही त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. धवलसिंह यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने माढा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा रंगली आहे. पक्षाकडून लवकरच उमेदवाराचे नाव स्पष्ट होईल, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.