दिल्लीतील महाराष्ट्र सदनातल्या अनागोंदी कारभाराविरुद्ध शिवसेनेने शुक्रवारी निवासी आयुक्त बिपीन मलिक यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला. त्यामुळे याप्रकरणी सरकारला आता उत्तर द्यावे लागणार आहे.
‘… मग रमजानमध्ये बलात्कार करणाऱया मुस्लिम शिक्षकाबद्दल तोंड का बंद?’
महाराष्ट्र सदनात मराठी खासदारांना मिळणारी दुय्यम वागणूक आणि तेथील गैरसोयीचा निषेध व्यक्त करत शिवसेनेच्या खासदारांनी गेल्या आठवड्यात आंदोलन केले होते. शिवाय सदनात खासदारांना मिळणारे जेवण हे निकृष्ट आहे, म्हणून कर्मचाऱ्यांना धाक दाखवत सेनेच्या खासदारांनी मुस्लीम कर्मचाऱयाच्या तोंडात पोळी कोंबून त्याचा ‘रोजा’ मोडल्याचा आरोप आहे. यावरून संसदेतही गदारोळ माजला. त्यानंतर आता महाराष्ट्र सदनात खासदारांची होणारी गैरसोय याविरोधात शिवसेना खासदारांनी निवासी आयुक्त बिपीन यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला आहे.
महाराष्ट्र सदनातील त्रुटींची चौकशी