News Flash

“राजभवनाच्या भिंतींना वाचाळ तोंड आहे हे मलिक यांनी उघड केलं”

राज्यपालांना काहीच काम नसतं असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं.

सत्यपाल मलिक

भाजपच्या राज्यात राज्यपालांना चांगलं काम आहे व ते आपापल्या नेमणुका सार्थ ठरवीत आहेत. फडणवीस व अजित पवार यांना झटपट शपथ देण्यासाठी राजभवन मध्यरात्री सक्रिय झाले व पहाटेपर्यंत काम चालवले. हे सर्व पाहिले तर राजभवन म्हणजे फक्त गोल्फच खेळण्याची किंवा ‘ढोसण्या’ची (‘घटनात्मक’) जागा आहे ही चिखलफेक आम्हाला मान्य नाही. राष्ट्रपती हा रबरी शिक्का किंवा शोभेचे पद आहे हा आरोप जुनाच आहे. राज्यपालांच्या बाबतीतही तेच म्हणावे लागते, पण जे आहे ते आहेच. गोव्याच्या राज्यपालांनी जे सांगितले ते सत्य असेलही, पण आपल्या देशात सध्या तसे कुणालाच काम उरलेले नाही, असं म्हणत शिवसेनेने राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

दोन दिवसांपूर्वी गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. “राज्यपालांना काहीच काम नसतं. काश्मीरमध्ये जे राज्यपाल असतात ते तर नेहमी दारु ढोसत बसतात आणि गोल्फ खेळतात. इतर ठिकाणचे राज्यपाल तर आरामात राहतात कोणत्याही वादात ते पडत नाहीत,” असं ते म्हणाले होते. यावरून शिवसेनेनं त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अनेकदा गोवऱया स्मशानात गेल्यावरच इथे नेमणुका होत असतात. त्यामुळे इथे येणारा पेन्शनर नक्की करतो काय? हा प्रश्नच आहे, राजभवनाच्या भिंतींना वाचाळ तोंड आहे, हे मलिक यांनी उघड केलं, असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून त्यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?
राज्यपाल पदाविषयी आपल्या देशात अनेकदा चर्चा झाली आहे. राज्यपाल हे शोभेचे पद आहे, राजभवन म्हणजे जनतेच्या पैशांवर पोसले जाणारे पांढरे हत्ती आहेत, राजभवन म्हणजे निक्रिय ठरवलेल्या राजकारण्यांचा वृद्धाश्रम आहे या व अशा अनेक उपाध्या लावण्यात आल्या, पण ‘‘राजभवन किंवा राज्यपाल ही दारू ढोसण्याची जागा आहे’’ असा स्फोट गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. राजभवनात नक्की काय चालते याबाबतचा खुलासा राज्यपाल पदावरील व्यक्तीनेच करण्याचा हा इतिहासातील पहिलाच प्रसंग असेल. त्यामुळे सत्यपाल मलिक यांना कोणती सर्वोच्च पदवी देऊन गुणगौरव करावा हे देशाच्या गृहमंत्रालयाने ठरवायला हवे.

अनेकदा गोवऱ्या स्मशानात गेल्यावरच इथे नेमणुका होत असतात. त्यामुळे इथे येणारा पेन्शनर नक्की करतो काय? हा प्रश्नच आहे. त्याचे चोख उत्तर गोव्याचे महनीय राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिले आहे. महनीय राज्यपाल महोदय सांगतात, ‘‘राज्यपालांना काहीच काम नसते. कश्मीरमध्ये जे राज्यपाल असतात ते तर नेहमी दारू ढोसत बसतात आणि गोल्फ खेळतात. इतर ठिकाणचे राज्यपाल तर आरामात राहतात. डोक्याला फार ताप करून घेत नाहीत.’’ श्रीमान राज्यपालांचे हे विधान राजभवनाची प्रतिष्ठा कलंकित करणारे आहे.

गोवा हे पर्यटकांचे मोठे केंद्र आहे. तेथील राज्यपालांचे निवासस्थान म्हणजे ‘काबो राजभवन’ हे देशातील प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाण आहे. गोव्याच्या राजभवनात परदेशी पै-पाहुणे येतात तेव्हा त्यांना हळदमिश्रित दुधाचे ग्लास दिले जातात काय? राज्यपाल आत काय करतात हा त्यांचा प्रश्न, पण त्यांनी शिस्तीची चौकट मोडू नये. आंध्रच्या राजभवनाच्या रंगीतसंगीत कहाण्या एन. डी. तिवारी यांच्या काळात बाहेर पडल्याच होत्या. त्यामुळे राजभवनाच्या भिंतीना फक्त कान नाहीत, तर डोळेही असतात; पण राजभवनाच्या भिंतींना ‘वाचाळ’ तोंडही आहे हे सत्यपाल मलिक यांनी उघड केले आहे. गोवा हे पर्यटकांचे मोठे केंद्र आहे. तेथील राज्यपालांचे निवासस्थान म्हणजे ‘काबो राजभवन’ हे देशातील प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाण आहे. गोव्याच्या राजभवनात परदेशी पै-पाहुणे येतात तेव्हा त्यांना हळदमिश्रित दुधाचे ग्लास दिले जातात काय? राज्यपाल आत काय करतात हा त्यांचा प्रश्न, पण त्यांनी शिस्तीची चौकट मोडू नये. आंध्रच्या राजभवनाच्या रंगीतसंगीत कहाण्या एन. डी. तिवारी यांच्या काळात बाहेर पडल्याच होत्या. त्यामुळे राजभवनाच्या भिंतीना फक्त कान नाहीत, तर डोळेही असतात; पण राजभवनाच्या भिंतींना ‘वाचाळ’ तोंडही आहे हे सत्यपाल मलिक यांनी उघड केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 7:32 am

Web Title: shiv sena saamna editorial criticize goa governor satyapal malik over his statement jud 87
Next Stories
1 माजी सरन्यायाधीश गोगोई यांच्या  राज्यसभेवरील नियुक्तीने वादळ
2 समान नागरी संहितेवर संसदेत चर्चा करा!
3 संपूर्ण युरोप र्निबधांमुळे ठप्प
Just Now!
X