News Flash

कर्नाटकात शिवसेनेची भाजपाला टक्कर, ५० ते ५५ जागा लढवणार

मुख्यमंत्र्यांनी सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करावा

( प्रतिकात्मक छायाचित्र )

उत्तर प्रदेश, गोवापाठोपाठ कर्नाटकातही शिवसेनेने भाजपाला टक्कर देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शिवसेना ५० ते ५५ जागा लढवणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तर सीमा भागात शिवसेना निवडणूक लढवणार नसून महाराष्ट्र एकीकरण समितीला शिवसेना पाठिंबा देईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेनेने काही महिन्यांपूर्वी केली होती. देशातील अन्य राज्यांमध्येही शिवसेना स्वबळावरच लढेल, अशी घोषणा त्यावेळी करण्यात आली होती. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार शिवसेनेने कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा आणि उत्तर प्रदेशपाठोपाठ कर्नाटकची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत शिवसेनेने भाजपाला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे.

बेळगावमधील सीमा भागात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार नाही, या भागात इतर पक्षांनीही निवडणूक लढवू नयेत. जोपर्यंत या प्रश्नावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत या भागाला केंद्रशासित प्रदेश जाहीर करावे, अशी मागणीच त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करावा, तरच ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरतील, असे सांगत त्यांनी फडणवीस यांना आव्हान दिले. मुख्यमंत्र्यांनी सीमा भागात प्रचाराला जाऊ नये. हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 3:12 pm

Web Title: shiv sena to contest 50 55 seats in karnataka elections says mp sanjay raut
Next Stories
1 जिथे जिथे हिंदू कमी झाले तिथेच दंगली: साक्षी महाराज
2 ३९ भारतीयांचे मृतदेह आणण्यासाठी व्ही.के. सिंग इराकला रवाना
3 भागलपूर दंगलीप्रकरणी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक
Just Now!
X