25 February 2021

News Flash

शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

न्या. शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिल्यानंतर मुदत संपण्याआधीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्याने शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादीप्रमाणेच आपल्यालाही राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी पुरेसा वेळ दिला नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे शिवसेनेने राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शिवसेनेच्यावतीने सुप्रीम कोर्टात काँग्रेस नेते आणि वरिष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत. न्या. शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्रात सत्तस्थापनेचा अभूतपूर्व घोळ निर्माण झाला आहे. भाजपाने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवली त्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिलं. मात्र त्यांना हा दावा सिद्ध करता आला नाही. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला रात्री साडेआठ वाजेपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा सिद्ध करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत संपण्याआधीच राज्यात राज्यपालांच्या शिफारशीने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

२४ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल लागला, निकालामध्ये महायुतीला कौल मिळाला. मात्र, अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं अशी आग्रही भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आली होती. त्यामुळे आमचं ठरलंय वरुन आमचं बिनसलंयपर्यंत हे दोन पक्ष आले. त्यानंतर भाजपाने शिवसेना सोबत येत नसल्याने सत्तास्थापनेत असमर्थता दर्शवली. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरु केली. मात्र शिवसेनेला जी वेळ देण्यात आली होती त्या वेळेत शिवसेनेलाही दावा सिद्ध करता आला नाही. मात्र, आपल्याला खूपच कमी कालावधी राज्यपालांनी दिल्यामुळेच दावा सिद्ध करता आला नाही असे शिवसेनेने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 6:13 pm

Web Title: shiv senas petition to be heard tomorrow in supreme court aau 85
Next Stories
1 शिवसेनेपाठोपाठ भाजपा NDA मधल्या आणखी एक पक्षामुळे हैराण
2 जम्मू-काश्मीर : भीषण अपघातात १६ जणांचा मृत्यू
3 युट्यूब व्हिडीओसाठी रस्त्यावर भूत बनून प्रँक करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून अटक
Just Now!
X