ज्या महापुरुषाने आम्हाला आमची ओळख करून दिली आणि आम्ही का जगायचं याचा मंत्र दिला त्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मानाचा मुजरा, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंतीनिमित्त शिवरायांना अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शनिवारी तिथीनुसार मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी करण्यात येत आहे. शनिवारी सकाळी राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून रयतेच्या राजाला विनम्र अभिवादन केले. ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणतात, ज्या महापुरुषाने आम्हाला आमची ओळख करून दिली आणि आम्ही का जगायचं याचा मंत्र दिला त्या आपल्या सर्वांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मानाचा मुजरा.

राज ठाकरे यांनी यात एक व्हिडिओ देखील ट्विट केला आहे. हा व्हिडिओ एक मिनिटे १० सेकंदाचा असून या व्हिडिओचे वैशिष्ट्य म्हणजे व्हिडिओतील व्हॉइस ओव्हर राज ठाकरे यांचे आहे. राज ठाकरे यांचा आवाज असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस पडत आहे.