07 March 2021

News Flash

छत्रपती शिवाजी महाराज कन्नड वंशाचे; कर्नाटकच्या मंत्र्यानं केला अजब दावा

सीमा प्रश्नांवरुन कर्नाटकच्या दोन उपमुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर चौफेर टीका

आघाडी सरकारमधील वादावरून लक्ष उडवण्यासाठी महाराष्ट्रांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सीमा प्रश्न उकरून काढत आहेत, अशी टीका कर्नाटकच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी केली असून शिवाजी महाराजांचे पूर्वज कन्नड होते, असा अजब दावाही त्यांनी केला आहे. ठाकरे यांनी बेळगावी, कारवार व निपाणी महाराष्ट्रात सामील करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

कर्नाटकातील मराठी भाषिक भाग सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत केंद्रशासित प्रदेश जाहीर करावेत अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच केली होती. त्यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोल म्हणाले, “ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे नाव शिवाजी महाराजांच्या नावावरून ठेवले असले तरी शिवाजी महाराज कन्नड होते हा इतिहास ठाकरे यांना माहिती नाही. शिवाजी महाराजांचे पूर्वज बेलीयप्पा हे गदग जिल्ह्यातील सोरतूरचे होते. गदग जिल्ह्यात दुष्काळ पडल्यानंतर ते महाराष्ट्रात गेले. शिवाजी महाराज हे त्या घराण्यातील चौथ्या पिढीतील प्रतिनिधी होते,” असा दावा त्यांनी केला आहे.

तर दुसरे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी म्हटलं की, “ठाकरे यांनी मराठी भाषिक भागांचा प्रश्न त्यांच्या सरकारमधील मतभेदांवरून लक्ष उडवण्यासाठी उकरून काढला आहे. त्यांना करोनाची साथ हाताळता आली नाही, त्यामुळे त्यांची लोकप्रियता संपुष्टात आली आहे.” सावदी यांनी ठाकरे यांच्या विधानावर मुंबई हा कर्नाटकचा भाग करावा व केंद्राने त्या निर्णयापर्यंत मुंबई हा केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा, अशी मागणी केली होती.

दरम्यान, बेळगावीचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले, की कर्नाटकची याबाबतची भूमिका कायम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 9:10 pm

Web Title: shivaji maharaj of kannada descent the karnataka minister made a strange claim aau 85
Next Stories
1 राहुल गांधींना तत्काळ राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी दिल्ली काँग्रेसनं मंजूर केला ठराव
2 कृषी कायद्यांबाबत शरद पवारही आपली भूमिका बदलतील – नरेंद्रसिंह तोमर
3 हे सरकार निवडणूक जिंकणारी मशीन आहे; मेहबुबा मुफ्तींचा मोदी सरकारवर निशाणा
Just Now!
X