मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपली करोना चाचणी नकारात्मक आल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. चौहान यांना सहा दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले होते. चौहान यांना २५ जुलै रोजी करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना खासगी रुग्णालयातून ५ ऑगस्ट रोजी घरी पाठविण्यात आले होते आणि तेव्हापासून ते घरीच विलगीकरणात होते. आपला करोना चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बुधवापर्यंत विलगीकरणात राहणार आहोत, असे चौहान यांनी ट्वीट केले आहे.