20 January 2021

News Flash

सोशल मीडिया सोडण्याबद्दल संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींना सल्ला, म्हणाले…

दिल्लीतील हिंसाचारावरून साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्यासंदर्भात जाहीर केलेल्या निर्णयावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सामान्य माणसांबरोबर राजकीय नेतेही याविषयी बोलत असून, राष्ट्रवादी काँग्रेस मोदी यांच्या निर्णयाचं स्वागत करू असं म्हटलं आहे. तर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना सल्ला दिला आहे.

खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया सोडण्याच्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. ‘एपीबी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत म्हणाले,’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियासंदर्भात जो निर्णय घेतला, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांच्या पक्षाचे नेते सांगत असतात की सोशल मीडियातील योद्धे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. सरसेनापतीच सोडून जात असेल, योध्यांनी काय करायचं? सोशल मीडियाचा गैरवापर वाढला आहे. पण, मोदींनी सोशल मीडिया सोडून नये. त्यांना फॉलो करणारे सोशल मीडियातील त्यांचे चाहते अनाथ होतील,” असं संजय राऊत म्हणाले.

आणखी वाचा- सोशल मीडियाला रामराम करण्याचा विचार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान, गृहमंत्र्यांना जवाब द्यावा लागेल –

राजधानी दिल्लीत सीएए समर्थक आणि विरोधक यांच्यातील वाद विकोपाला जाऊन प्रचंड हिंसाचार उसळला. यात ४५ नागरिकांचा मृत्यू झाला. सध्या संपूर्ण हिंसाचाराची न्यायालयात सुनावणी सुरू असून, परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. दिल्लीतील हिंसाचाराविषयी बोलताना राऊत म्हणाले,’दिल्लीत जे काही घडलं, त्याला केंद्रीय गृहमंत्री जबाबदार आहेत. त्यांना याची जबाबदारी घ्यावी लागेल. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. संसदेत हिंसाचाराबद्दल चर्चा होणार आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना जबाब द्यावा लागेल,’ असं संजय राऊत म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 10:59 am

Web Title: shivsena leader sanjay raut gave advice to narendra modi bmh 90
Next Stories
1 Video: संसद परिसरात धडकली कार; सुरक्षा रक्षकांनी लगेच रोखल्या बंदुका
2 पंतप्रधान मोदी आणणार भारतीय सोशल मीडिया? रविवारी घोषणेची शक्यता
3 कोरोना : भारतानं रद्द केले इराणी नागरिकांचे व्हिसा
Just Now!
X