News Flash

शिवसेना ‘बाजीराव-मस्तानी’च्या पाठिशी

शिवसेनेचा या चित्रपटाला विरोध नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले

शिवसेना खासदार संजय राऊत

संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात विरोध केला असताना, शिवसेनेने या चित्रपटाच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीमध्ये वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेचा या चित्रपटाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले.
‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट देशभरात शुक्रवारी प्रदर्शित झाला. पुण्यातील कोथरूड सिटी प्राईड चित्रपटागृहाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी या चित्रपटाविरोधात निदर्शने करीत त्याचे शो बंद पाडले. यामुळे सिटी प्राईड चित्रपटगृह व्यवस्थापनाने ‘बाजीराव-मस्तानी’चे शुक्रवारचे सर्व शो रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा या चित्रपटाला विरोध नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले, ऐतिहासिक पुरुषांवर चित्रपट बनतो, त्यावेळी त्यात थोडे व्यावसायिक स्वातंत्र्य घ्यावे लागते. या चित्रपटाच्या निमित्ताने बाजीरावासारख्या योद्ध्याची कथा मोठ्या पडद्यावर आली आहे, याकडेही लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 11:32 am

Web Title: shivsena leader sanjay raut supports bajirao mastani movie
टॅग : Bajirao Mastani
Next Stories
1 लोकांना केलेल्या कामांची माहिती द्या, विरोधकांचा खरा चेहरा समोर आणा – मोदींचे मंत्र्यांना आवाहन
2 राज्यसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांना जादा अधिकारांची मागणी
3 जागतिक नाणेनिधीच्या अध्यक्षांविरोधात खटला
Just Now!
X