News Flash

शिवसेनेच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या; पत्नी व मुलगीही जखमी

मंगळवारी मध्यरात्रीची घटना

संग्रहित छायाचित्र/ सोशल मीडिया

मध्य प्रदेशातील शिवसेनेचे नेते रमेश साहू यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपींनी केलेल्या गोळीबारात साहू यांची पत्नी व मुलगी जखमी झाली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरू पोबारा केला. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

इंदौरमधील तेजाजी शहर पोलीस ठाणे हद्दीत उमरीखेडा येथे शिवसेनेचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष असलेल्या रमेश साहू यांचा ढाबा आहे. या ढाब्यावरच साहू यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते जागीच मरण पावले. तर त्यांना वाचवण्यासाठी आलेली त्यांची पत्नी व मुलगी जखमी झाली आहे. सकाळी ढाब्यावरील कर्मचारी आत गेल्यानंतर ही घटना समोर आली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास घडली, असं पोलिसांनी सांगितलं.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं. पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनाला पाठवून चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळावरून कोणतीही वस्तू चोरीला गेलेली नसून, आरोपी केवळ साहू यांची हत्या करून फरार झाले. त्यामुळे या हत्येमागे जुना वाद असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

साहू हे १० वर्षांपेक्षा अधिक काळ शिवसेनेचे मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्ष होते. साहू यांच्यावर इंदौरमधील दोन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे आपसातील वादातून ही हत्या केली गेल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत कनकने यांनी या प्रकरणावर बोलण्यास माध्यमांना नकार दिला. पोलिसांनी ढाब्यावर कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 2:09 pm

Web Title: shivsena leader shot dead in publicly in indore madhya pradesh bmh 90
Next Stories
1 पाकिस्तानच्या गोळीबारात लष्कराचा JCO शहीद
2 ‘मन की बात’मध्ये मोदींनी उल्लेख केलेल्या भारतीय Apps ची चलती; प्ले स्टोअरवर Top 10 मध्ये दाखल
3 कचऱ्याच्या ढिगामुळे ‘राफेल’ फायटर विमानांच्या सुरक्षेला धोका
Just Now!
X