शिवसेनेने अग्रलेख लिहण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडावं असं वक्तव्य एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरतं आणि आपली भीती लपवण्यासाठी त्यांनी संपादकीय लिहिण्याची हा नवा मार्ग शोधून काढला आहे असा टोला असदुद्दीन ओवेसी यांनी लगावला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी माझे पूर्वज भारतीय होते हे मी सिद्ध करु शकतो असं म्हटलं आहे. ‘शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरते आणि आपली भीती लपवण्यासाठी त्यांनी फक्त संपादकीय लिहिण्याची ही नवी निती अवलंबली आहे. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी संपादकीय लिहिणं बंद करावं आणि मोदी, फडणवीस सरकारमधून बाहेर पडावं’, असं असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. मी तुम्हाला माझे पूर्वज भारतीय होते हे सिद्ध करुन दाखवू शकतो असंही ते म्हणाले आहेत.