News Flash

धक्कादायक : तीन वर्षीय चिमुकल्यासह महिलेने १७ व्या मजल्यावरून मारली उडी

ग्रेटर नोएडा येथील बिसरख ठाणे परिरातील घटना

प्रातिनिधिक

ग्रेटर नोएडा येथील बिसरख ठाणे परिरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका महिलेने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकल्यासह इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. कौटुंबिक वादानंतर महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेतील मृत महिलेचे नाव प्रियंका त्यागी आहे. त्या इको विलेज सोसायटीत राहत होत्या.

घटना घडली तेव्हा त्यांचा पती बाहेर गेलेला होता. तेव्हा घरातील अन्य सदस्याबरोबर त्यांचा वाद झाला व त्यांनी आत्महत्या केली. १७ व्या मजल्यावरून उडी मारल्याने घटनास्थळीच आई व मुलाचा मृत्यू झाला होता.

या अगोदर गाजियाबादमधील सिहानी गेट पोलीस ठाणे परिसरातील राजनगर परिसरात पाच वर्षीय मुलाचा १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 1:52 pm

Web Title: shocking a woman with a three year old boy jumped from the 17th floor msr 87
Next Stories
1 “आम्ही जिंकणार,” बायडेन यांनी व्यक्त केला विश्वास; व्हाईट हाऊसमध्ये तयारी सुरु
2 …तर त्यांना सन्मानाने निरोप दिला पाहिजे – संजय राऊत
3 हवं असल्यास फारूख अब्दुल्लांनी पाकिस्तानात जाऊन कलम ३७० लागू करावं : संजय राऊत