गेल्या दोन वर्षात भारतात १,१०,३३३ बलात्काराच्या घटना घडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ही सरकारकडील अधिकृत आकडेवारी असल्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी बुधवारी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले.

रिजीजू म्हणाले, २०१६ मध्ये ३८, ९४७ बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आहे. २०१५ मध्ये ३४,६५१ इतकी तर २०१४मध्ये ३६,७३५ बलात्काराच्या घटनांच नोंद झाली आहे. त्याचबरोबर २०१६ मध्ये महिलांबाबत ३.३८,९५४ इतके गुन्हे घडल्याची नोंद सरकार दरबारी असून २०१५ मध्ये ही संख्या ३,२९,२४३ तर २०१४ मध्ये ती ३,३९,४५७ इतकी असल्याचे रिजीजू यांनी सांगितले.