News Flash

धक्कादायक CCTV! मुलाने कानशिलात लगावली…आईने जागेवरच सोडला प्राण

मुलाने स्वतःच्या जन्मदात्या आईला इतकी जोरदार कानशिलात लगावली की वृद्ध आई खाली पडली आणि जागेवरच जीव सोडला...

( व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट )

देशाची राजधानी दिल्लीच्या द्वारका परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहीत मुलाने स्वतःच्या जन्मदात्या आईला इतकी जोरदार कानशिलात लगावली की वृद्ध आई खाली पडली आणि जागेवरच जीव सोडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंडियाटुडेच्या वृत्तानुसार, या घटनेत अवतार कौर या ७६ वर्षांच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेपूर्वी महिला आणि तिच्या शेजार्‍यांमध्ये पार्किंगवरुन वाद झाला होता. शेजाऱ्याने पीसीआरवर कॉलही केला होता, परंतु पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर तक्रारदार महिलेने वाद मिटला असून पुढील कारवाई करायचं नसल्याचं सांगितलं.

त्यानंतर मुलगा रणबीरने अवतार कौर यांना शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणाबाबत विचारणा केली आणि त्यांच्यात बाचाबाचीला सुरूवात झाली. वाद वाढला आणि रागाच्या भरात मुलाने वृद्ध अवतार कौर यांच्या जोरदार कानशिलात लगावली. ही थापड इतकी जोरात होती की त्यानंतर कौर खाली पडल्या. त्यावेळी कौर यांती सून देखील तिथे होती. नंतर मुलाने आणि सुनेने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले, पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


दरम्यान, बिंदापूर पोलिसांनी कौर यांचा 45 वर्षीय मुलगा रणबीर याच्याविरूद्ध भारतीय दंड संहिता कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 9:35 am

Web Title: shocking incident caught on cctv elderly woman dies after being slapped by son in delhi dwarka sas 89
Next Stories
1 दोन मसाज पार्लरमध्ये अंदाधूंद गोळीबार; आठ जणांचा मृत्यू
2 महाविकास आघाडी सरकार भक्कम!
3 राज्यात करोनाची दुसरी लाट!
Just Now!
X