25 September 2020

News Flash

पत्रकारपरिषदेत अरविंद केजरीवालांवर फेकला बूट; हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

या घटनेमुळे पत्रकारपरिषदेत काहीवेळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

काँग्रेस नेते पीसी चाको यांनी या घटनेला केजरीवाल यांची हुकूमशाही वृत्ती कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना शनिवारी एका व्यक्तीने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. दिल्लीतील सम-विषम वाहना योजनेविषयी माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत हा प्रकार घडला. पत्रकारपरिषद सुरू असताना या व्यक्तीने केजरीवालांच्या दिशेने बूट फिरकावला. मात्र, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या ‘आप’च्या एका सदस्याने तो पकडला. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीला लगेचच ताब्यात घेण्यात आले. या व्यक्तीचे नाव वेदप्रकाश असून तो ‘आप’पासून वेगळ्या झालेल्या आम आदमी सेनेचा असल्याची महितीआहे. या घटनेमुळे पत्रकारपरिषदेत काहीवेळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, काँग्रेस नेते पीसी चाको यांनी या घटनेला केजरीवाल यांची हुकूमशाही वृत्ती कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 5:09 pm

Web Title: shoe hurled at cm arvind kejriwal during a press conference in delhi man detained
Next Stories
1 परदेश दौऱ्यात वेळ वाचविण्यासाठी मोदी विमानातच करतात झोप पूर्ण
2 मल्ल्यांनी ‘ईडी’ला तिसऱ्यांदा टाळले, मे महिन्यापर्यंत मुदतीची मागणी
3 मर्सिडीजने पादचाऱ्याला उडवणाऱ्या त्या अल्पवयीन मुलावर यापूर्वीही अपघाताचा गुन्हा
Just Now!
X