23 September 2020

News Flash

अमेरिकेत गोळीबार चार ठार, १२ जखमी

अमेरिकेत पीटर्सबर्ग सिनगॉग येथे झालेल्या गोळीबारात चार जण ठार झाले असून तीन अधिकारी जखमी झाले आहेत.

अमेरिकेत पीटर्सबर्ग सिनगॉग येथे झालेल्या गोळीबारात चार जण ठार झाले असून तीन अधिकारी जखमी झाले आहेत. हल्लेखोराला प्रत्युत्तर देत असताना हे अधिकारी जखमी झाल्याचे वृत्त सीएनएनने दिले आहे. गोळीबारात जखमी झालेल्या अधिकाऱ्यांबद्दल तात्काळ माहिती मिळू शकलेली नाही. एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती केडीकेएकडून देण्यात आली आहे.

गोळीबारामध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याचे पोलीस कमांडरने सांगितले. स्क्वीरील हिल येथील इमारतीत हा हल्लेखोर असल्याची माहिती आहे. घराच्या बाहेर पडू नका असे पीटसबर्गचे पोलीस कमांडर जेसन लांडो यांनी स्थानिक रहिवाशांना आवाहन केले आहे. घटनास्थळांना पोलिसांनी घेराव घातला आहे. स्थानिक वृत्तवाहिन्यांवर सशस्त्र पोलीस परिस्थिती हाताळत असल्याचे दाखवण्यात येत आहे.

पोलिसांनी काही मार्ग बंद केले असून रुग्णवाहिका सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पीटसबर्गमधील घडामोडींवर आपले लक्ष असल्याचे टि्वट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटन यांना पार्सल बॉम्ब पाठवण्यात आला होता. अमेरिकेत यापूर्वी सुद्धा गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 10:24 pm

Web Title: shoot at out at us four dead
Next Stories
1 मनोहर पर्रिकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग, गोवा सरकारची माहिती
2 नक्षलवाद्यांबरोबर चकमकीत सीआरपीएफचे पाच जवान शहीद
3 आम्ही भाजपाच्या दयेने सत्तेत आलेलो नाही हे अमित शाह यांनी लक्षात ठेवावे – केरळ मुख्यमंत्री
Just Now!
X