News Flash

माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांची कन्या श्रेयसीचा भाजपात प्रवेश

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांच्या कन्या आणि नेमबाज श्रेयसी सिंह यांनी भाजपात प्रवेश केला आहे. बिहार निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे नेते दिग्विजय सिंह हे काँग्रेसमध्ये होते. त्यांनी रेल्वे, अर्थ, परराष्ट्र मंत्रायलायची जबाबदारी सांभाळली होती. २०१० मध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर आता त्यांच्या कन्येने म्हणजेच श्रेयसी सिंहने भाजपात प्रवेश केला आहे.

श्रेयसी ही राष्ट्रीय स्तरावरची नेमबाज आहे. २०१८ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने सुवर्णपदकही पटकावले होते. २०१४ मध्ये श्रेयसी यांच्या आईल पुतुलदेवी या भाजपाच्या तिकिटावर लोकसभा पोटनिवडणूक लढल्या. २०१९ मध्ये ही जागा जदयूकडे गेल्याने त्या नाराज झाल्या आणि अपक्ष निवडणूक लढली. त्यामुळे भाजपाने त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं होतं. ज्यानंतर श्रेयसी राजकारणात येईल असा अंदाज वर्तवला होता. श्रेयसी राजदमध्ये सहभागी होईल अशी शक्यता होती मात्र तिने भाजपात प्रवेश केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 1:51 pm

Web Title: shooter shreyasi singh to join bjp she is the daughter of former union minister late digvijay singh scj 81
Next Stories
1 राष्ट्रीय जनता दलाच्या माजी राज्य सचिवाची गोळी घालून हत्या
2 Bihar Election 2020 : नितीशकुमारांचं एक पाऊल मागं; भाजपासोबत ठरला फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला?
3 केरळ : नौदलाच्या ग्लायडरला अपघात, दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू
Just Now!
X