23 September 2020

News Flash

जम्मू-काश्मीर : शोपियांमध्ये चमकतीत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद

त्याचबरोबर जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचीही एक घटना पूंछ भागात समोर आली आहे.

संग्रहित प्रातिनिधीक छायाचित्र

जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची एक घटना पूंछ भागात समोर आली आहे. पूंछ ब्रेगेड मुख्यालयाला यामध्ये निशाणा बनवण्यात आले होते. त्याचबरोबर शोपियां भागातही दहशतवाद्यांसोबत सुरक्षा रक्षकांची चकमक झाली. यामध्ये ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. मात्र, यात एक जवानही शहीद झाला आहे.

शोपियां जिल्ह्यातील नंदीगाम भागात सुरक्षा रक्षकांना २ ते ३ दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर या भागाला वेढा देण्यात आला. दरम्यान, दोन्ही बाजूंकडून सुरु झालेल्या गोळीबारात सुरक्षा रक्षकांनी ४ दहशतवाद्यांना कंटस्नान घतले. तर यात एक जवानही शहीद झाला आहे. तर इतर दोन जवान जखमी झाले आहेत. ही चकमक आणि कारवाई अद्यापही सुरुच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 9:16 am

Web Title: shopian encounter four terrorists have been gunned down by security forces
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 छत्तीसगढमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; ९ मंत्र्यांसह १०७९ उमेदवार रिंगणात
3 अमेरिकेत हॉस्पिटलमध्ये गोळीबार, हल्लेखोर ठार, तीन जखमी
Just Now!
X