News Flash

शोपियानमध्ये जोरदार चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

दोन जवान जखमी; मोबाईल इंटरनेट सेवा खंडीत

संग्रहीत

दक्षिण काश्मीर भागातील शोपियान जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या चकमकीत आतापर्यंत दोन दहशवतवाद्यांचा खात्मा झाला, दोन जवान जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या देखील परिसरात चकमक सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मोबाईल इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आलेली आहे.

येथील कनिगाम या गावात दहशतवादी दडून बसलेले असल्याची माहिती शुक्रवारी जवानांना मिळाली होती. त्यानुसार जवानांकडून परिसरास वेढा देण्यात आला व शोधमोहीम सुरू झाली. दरम्यान, जवानांची चाहूल लागताच दडून बसलेल्या दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू झाला. त्यानंतर जवानांकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यास सुरू झाल्याने चकमक सुरू झाली.

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दहशतवादी पळून जाऊ नये म्हणून, जवानांकडून परिसरात फ्लड लाईट्स देखील लावले गेले. यानंतर चकमक सुरूच राहिली दरम्यान आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती काश्मीर झोनच्या पोलिसांकडून देण्यात आलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 2:14 pm

Web Title: shopian encounter update one more unidentified terrorist neutralised two 2 terrorists neutralised msr 87
Next Stories
1 “हलाल मांस हिंदू, शीख धर्माविरोधात; रेस्तराँ मालकांनी मांस कोणतं ते स्पष्टपणे लिहावं”
2 भाजपाने का काढला होता मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा?; मोदींनी सांगितलं कारण
3 ऐतिहासिक… २१ व्या वर्षी महापौर; Bsc सेकंड इयरची विद्यार्थिनी पाहणार राजधानीच्या शहराचा कारभार
Just Now!
X